"शिवगंगा, वाजेघर आणि वांगणी उपसा"चे होणार सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:15 AM2021-08-19T04:15:15+5:302021-08-19T04:15:15+5:30
या वेळी आमदार संग्राम थोपटे, समिती अध्यक्ष दिनकर धरपाळे, सचिव अरविंद सोंडकर, रमेश कोंडे, ज्ञानेश्वर शिंदे, शैलेश वालगुडे, संतोष ...
या वेळी आमदार संग्राम थोपटे, समिती अध्यक्ष दिनकर धरपाळे, सचिव अरविंद सोंडकर, रमेश कोंडे, ज्ञानेश्वर शिंदे, शैलेश वालगुडे, संतोष रेणुसे, प्रताप शिळीमकर, लहुनाना शेलार, दिगंबर चोरघे, बाळासाहेब गरुड, विश्वास ननावरे, अमोल नलावडे, दिनकर सरपाले, विकास कोंडे, पोपट सुके, संपतराव आंबवले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिनकर धरपाळे म्हणाले, "या पूर्वीच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी या मागणीस तत्त्वतः मान्यता दिली होती. मात्र, कृष्णा खोरे महामंडळाने प्रकल्पात अतिरिक्त पाणीसाठा नसल्याने मान्यता देणे शक्य होणार नाही, असा अहवाल दिला होता. यानंतर आमदार संग्राम थोपटे यांनी नवीन महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा करून धरणाच्या फुगवट्यामधील राखीव असणाऱ्या ०.४३ टीएमसी पाण्याच्या कोट्यातून या तिन्ही प्रकल्पासाठी पाणी देता येणे शक्य असल्याचे निदर्शनास आणल्यावर गुंजवणी प्रकल्पाच्या पाणी नियोजनात कोणतेही बदल न करता या मागणीस मान्यता देण्यात आली. योजनांचे सर्वेक्षण करून कामाचे टेंडर देण्यात आले आहे."
१९ तारखेला सकाळी अकरा वाजता वाजेघर, दुपारी २ वाजता वांगणी येथे, तर ५ वाजता शिवगंगा खोऱ्यासाठी खेड शिवापूर येथे सर्वेक्षणाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होत आहे.
कापूरव्होळ (ता. भोर) येथे शिवगंगा, वाजेघर आणि वांगणी उपसाचे दि. १९ पासून सर्वेक्षण होणार असल्याची माहिती देताना आमदार संग्राम थोपटे.
180821\img_20210816_184604.jpg
सोबत फोटो व ओळ :
कापूरव्होळ (ता.भोर) येथे शिवगंगा,वाजेघर आणि वांगणी उपसा'चे दि.१९ पासून सर्वेक्षण होणार असल्याची माहिती देताना आमदार संग्राम थोपटे.