जीआयएसद्वारे रोप लागवडीचे सर्वेक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 08:17 PM2018-04-21T20:17:22+5:302018-04-21T20:17:22+5:30

वन विभागातर्फे लावलेल्या रोपांच्या लागवडीबाबत नेहमीच आक्षेप घेतला जातो. त्यामुळे वन विभागासह शासनाच्या विविध विभागांतर्फे रोपांची लागवड करताना जीआयएस प्रणालीचा वापर करावा लागणार आहे.

Survey of tree plantation by GIS | जीआयएसद्वारे रोप लागवडीचे सर्वेक्षण 

जीआयएसद्वारे रोप लागवडीचे सर्वेक्षण 

googlenewsNext
ठळक मुद्देया सर्वेक्षणातून रोपांची अचूक संख्या उपलब्ध होणारवड, पिंपळ,आंबा, चिंच, हिरडा, कडू लिंब, सिताफळ, जांभूळ, बांबू आदी रोपांची लागवड केली जाणार

पुणे: राज्याच्या वन विभागातर्फे राबविल्या जाणा-या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांसाठी वनयुक्त शिवार हे मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले असून रोपांची लागवड करताना जीआयएस प्रणालीचा अवलंब करावा लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती रोपांची लागवड करण्यात आली ही माहिती नोंदवली जाणार आहे. परिणामी लागवड केलेल्या रोपांची अचूक संख्या उपलब्ध होणार आहे. जलयुक्त शिवारच्या पार्श्वभूमीवर राज्यात वनयुक्त शिवार कार्यक्रम राबविला जात असून त्या अंतर्गत येत्या १ ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी रोपांची लागवड करण्यात येणार आहे. मात्र,वन विभागातर्फे लावलेल्या रोपांच्या लागवडीबाबत नेहमीच आक्षेप घेतला जातो. वृक्ष लागवड कार्यक्रमाची खोटी आकडेवारी जाहीर केली जात असल्याची टीका शासनावर केली जाते. त्यामुळे वन विभागासह शासनाच्या विविध विभागांतर्फे रोपांची लागवड करताना जीआयएस प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. कोणत्या ठिकाणी रोपे लावण्यात आली याची नोंद मोबाईल अ‍ॅपद्वारे करावी लागेल. संबंधित ठिकाणच्या नोंदीसह त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या रोपांचे फोटे अपलोड करावे लागतील.त्यामुळे कोणत्या विभागाने कोणत्या ठिकाणी रोपांची लागवड केली. हे समजू शकणार आहे.राज्य शासनातर्फे गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जात आहे.त्यात २०१६ मध्ये २ कोटी,२०१७मध्ये ४ कोटी रोपांची लागवड करण्यात आली तर २०१८ मध्ये १३ कोटी रोप लागवडीचे उद्दिष्ट्ट ठेवण्यात आले आहे.तसेच २०१९ मध्ये ३३ कोटी रोप लावण्याची निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. यंदा पुणे जिल्ह्यातील वन विभागातर्फे २५ लाख व सामाजिक वनिकरण विभागातर्फे ५ लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. तर कृषी विभागाकडून ५ लाख,पीएमआरडीएकडून दीड लाख ,शैक्षणिक संस्थांकडून २ लाख १६ हजार,जलसंपदा विभाग १ लाख तर पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांकडून प्रत्येकी ६० हजार रोपे लावली जाणार आहेत. रोपांची लागवड करताना जीआयएस प्रणालीद्वारे त्यांची नोंद कशी करावी; याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.त्यासाठी तालुका समन्वयक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.या समन्वयकांवर रोप लागवडीची नोंद ठेवण्याची जबाबदारी आहे.पुणे विभागीय वन विभागाचे सहाय्यक वन रक्षक वैभव भालेराव,वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वड, पिंपळ,आंबा, चिंच, हिरडा, कडू लिंब, सिताफळ, जांभूळ, बांबू आदी रोपांची लागवड केली जाणार आहे. विभागाकडे सुमारे ८६ हजार रोपे तयार आहेत.   

गेल्या दोन वर्षात करण्यात आले असून त्यातील सुमारे ७५ टक्के रोपे जिवंत असल्याची माहिती वैभव भालेराव यांनी दिली. तसेच नवनियुक्त जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी नुकतीच वृक्ष लागवडीबाबत आढावा बैठक घेतली. येत्या मे महिन्या वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आढावा बैठक घेणार आहे.
 

 

 

Web Title: Survey of tree plantation by GIS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.