पाणीपुरवठा व्यवस्थेचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:10 AM2020-12-26T04:10:34+5:302020-12-26T04:10:34+5:30
पुणे : * पाणीपुरवठा विभाग नवीन समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठ्याकरिता समान पाणीपुवठ्याच्या अनुषंगाने नुकतीच सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे़ परंतु, ...
पुणे :
* पाणीपुरवठा विभाग
नवीन समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठ्याकरिता समान पाणीपुवठ्याच्या अनुषंगाने नुकतीच सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे़ परंतु, तत्काळ कार्यवाही करण्यासाठी किंबहुना अगोदरपासून या २३ गावांमध्ये कशारितीने पाणीपुरवठा कार्यान्वित करण्यात येईल याचा अभ्यास पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असल्याची माहिती पुणे महापालिकेचे पाणी पुरवठा प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी दिली़
२३ गावांमधील जलस्त्रोत शोधण्याचे काम प्रारंभी आम्ही करीत असून, त्याचा वापर आपल्याला या गावांमध्ये कशारितीने करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत़ याचबरोबर चा गावांमधील सद्यस्थितीला अस्तित्व असलेली पाणीपुरवठा व्यवस्था, जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या यांचा वापर करता येईल का याचाही विचार सुरू आहे़
तिसऱ्या टप्प्यात नवीन काम करायला म्हणजे कुठे कुठे जलवाहिन्या टाकणे, पाण्याच्या टाक्यांची उभारणा करणे, व आहे ती पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी प्रारूप आराखडा करण्यास खात्यातील अधिकारी व कर्मचारी वर्गाला सांगण्यात आल्याचेही पावसकर यांनी सांगितले़
महापालिका हद्दीत आज ना उद्या २३ गावे येणार हे निश्चित होते़ त्यातच ११ गावांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थेचे काम करणारे अधिकारी यांना आसपासच्या गावांची बहुतांशी माहिती असून, तेथील पाणीपुरवठा व्यवस्थेचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत़ नव्याने येणाºया या २३ गावांमध्ये साधाणत: सात ते आठ लाख लोकसंख्या आहे़ त्यामुळे परडोई १३५ लिटर पाणी प्रती दिनी याप्रकारे पाण्याचे नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचेही पावसकर म्हणाले़
-----------------------------