सूर्यनारायणाने घेतले भुलेश्वराचे दर्शन , दुर्मिळ योग पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 03:09 PM2019-03-28T15:09:35+5:302019-03-28T15:15:31+5:30
दरवर्षी मार्च महिन्यामध्ये २८ मार्च रोजी भुलेश्वर मंदिरात किरणोत्सव होतो.
भुलेश्वर : पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरात गुरुवारी (दि. २८) सकाळी सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाने शिवलिंगाचे दर्शन घेतले. याप्रसंगी भुलेश्वर महाराज की जय च्या जयघोषाने आजूबाजूचा परिसर दुमदुमुन गेला. हा किरणोत्सव पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी मार्च महिन्यामध्ये २८ मार्च रोजी भुलेश्वर मंदिरात किरणोत्सव होतो .यामुळे आज किरणोत्सव होणार हे भाविकांना माहीत असल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी शिवलिंगासमोरील खिडकीतुन सूर्याची किरणे साधारण शंभर फुट आंतर पार करत मंदिराच्या गाभा-यातील भिंतीवर पडली. मंदिरातील वीज बंद करण्यात आल्यामुळे आतमध्ये पूर्ण अंधार होता. यामुळे सूर्याची किरणे अधिक प्रखर दिसत होती.सूर्य उगवल्यानंतर किरणे मंदिरात आली. व हळूहळू शिवलिंगाकडे येऊन भुलेश्वरच्या मुखवट्यावर पडली. आणि भुलेश्वर महाराज की जय च्या जयघोषाने भुलेश्वरचा परीसर दुमदुमुन गेला. भुलेश्वरच्या मुखवट्याचे तेज पाहुन भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्यानंतर मुखवटा बाजुला ठेवण्यात आला. व सुयार्ची किरणे शिवलिंगावर जाऊन पडली. शिवलिंग तेज होऊन सोनेरी दिसु लागले. हा क्षण पहाण्यासाठी भाविक पहाटेपासुन थांबुन होते.
....
भुलेश्वर देवस्थानचे पुजारी राजेंद्र गाडेकर यांनी सांगितले की सप्टेंबर महिन्यात सुर्यकिरण पिंडीपर्यंत येणे हा दुर्मिळ योग आसतो. यावेळी ढगाळ वातावरण असते. माञ २८ मार्च ला हमकाश सुर्येकिरण शिवलिंगावर पडते.यावेळी भुलेश्वर पंचक्रोशीतील माळशिरस, टेकवडी , यवत ,कासुर्डी अशा परिसरातील भाविकांनी गर्दी करतात .