सुशीलचंद्र सेन : बालवयातच क्रांतीची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:20+5:302021-06-04T04:10:20+5:30
दुसऱ्या दिवशी जनतेने त्याची मिरवणूक काढून सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या हस्ते त्याचा गौरव केला. त्यानंतरही अलीपूर खटल्यात त्याला गुंतवून दोन ...
दुसऱ्या दिवशी जनतेने त्याची मिरवणूक काढून सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या हस्ते त्याचा गौरव केला.
त्यानंतरही अलीपूर खटल्यात त्याला गुंतवून दोन वर्षे तुरुंगात डांबले. त्यातूनही तो निर्दोष सुटला. त्याचे नाव होते सुशीलचंद्र सेन!
१८९३ मध्ये बंगालमध्ये सिल्हट या गावी त्यांचा जन्म झाला . लहानपणापासूनच तो क्रांतिकार्याकडे वळला. अलीपूरच्या खटल्यातून सुटल्यावर १९१५ मध्ये काही क्रांतिकारकांसह त्याने सरकारी खजिना लुटला. रामकुंवर सावकाराच्या घरावर दरोडा टाकला, पण पोलिसांचा ससेमिरा लागला. पोलिसांच्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. पण सहकारी क्रांतिकारकांनी त्याला छोट्या नावेत घेतले. अंधारात गोळीबार चुकवत नाव विशाल नदीपात्रातून पुढे जात राहिली. मरणोन्मुख सुशीलने आपल्या मृत्यूनंतर आपले शिर कापून दुसरीकडे पुरण्यास सांगितले. ज्यामुळे केवळ धडावरून पोलिसांना साथीदारांचा शोध घेता येणार नाही. त्याच्या मृत्यूनंतर साथीदारांनी तसे केले. केवळ २१ वर्षांचा सुशीलचंद्र ६ मे १९१५ या दिवशी इंग्रजांच्या हाती न सापडता शहीद झाला.