स्वारगेट सहायक आयुक्तपदी सुषमा चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:15 AM2021-03-09T04:15:03+5:302021-03-09T04:15:03+5:30
लोकमत न्यूज नेटवक पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वारगेट विभागाच्या सहायक पोलिस ...
लोकमत न्यूज नेटवक
पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वारगेट विभागाच्या सहायक पोलिस आयुक्तपदी सुषमा चव्हाण यांची नियुक्ती केली. आयुक्त गुप्ता यांनी चव्हाण यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.
चव्हाण यांची १९८७ मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. त्यांनी पुणे, मुंबई, नवी मुंबई, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे काम केले आहे. तसेच पुणे शहर आयुक्तालयात देखील त्यांनी एक सक्षम महिला अधिकारी म्हणून विश्रामबाग, फरासखाना, कोथरुड, डेक्कन, भोसरी, गुन्हेशाखेची धुरा सांभाळली. एकंदर पुणे शहराची चांगली ओळख असलेल्या अधिकार्यांत त्यांची वर्णी लागते.
त्यांच्या कामाची दखल घेत २००७ मध्ये पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह, २०१० मध्ये गुणवत्तापुर्वक सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक तसेच २०२० साली उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक प्राप्त झाले आहे. विविध गुन्ह्यांच्या तपास यासाठी त्यांना आत्तापर्यंत ४७५ बक्षिसे मिळालेली आहेत.