पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा भागातून संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 15:48 IST2024-04-29T15:47:36+5:302024-04-29T15:48:02+5:30
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा पोलिसांनी एका संशयिताला पकडले आहे. अब्दुलाह रुमी (४८, सध्या रा. रिलॅक्स ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा भागातून संशयित ताब्यात
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा पोलिसांनी एका संशयिताला पकडले आहे. अब्दुलाह रुमी (४८, सध्या रा. रिलॅक्स पीजी सर्व्हिसेस, सोमनाथनगर, वडगाव शेरी) असे संशयिताचे नाव असून, बनावट आधारकार्ड, मतदार ओळखपत्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.
सहायक पोलिस निरीक्षक महेश लामखेडे यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रुमी मूळचा तामिळनाडूचा रहिवासी आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संशयितांची माहिती घेण्यात येत होती. येरवड्यातील गोल्फ क्लब चौकाजवळ एक संशयित थांबला असून, त्याच्याकडे बनावट आधारकार्ड आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
बनावट आधारकार्ड, मतदार ओळखपत्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक केली. रुमीने बनावट नावाने आधारकार्ड, मतदार ओळखपत्र का केले, यादृष्टीने तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दाेडमिसे तपास करत आहेत.