पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसरात तीन बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 03:22 PM2018-02-12T15:22:03+5:302018-02-12T15:22:26+5:30
कापूरहोळ फाट्यापासून आतमध्ये अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दिवळे गावामध्ये शेती आवरामध्ये तीन बिबट्यांच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर तब्बल ५० कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.
Next
ठळक मुद्देतीन बिबट्यांच्या संशयास्पद मृत्यू, ५० कावळ्यांचा मृत्यूबिबट्या नसून अन्या प्राणी असल्याचे सांगत वन विभागाने झटकले होते हात
भोर : कापूरहोळ फाट्यापासून आतमध्ये अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दिवळे गावामध्ये शेती आवरामध्ये तीन बिबट्यांच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर तब्बल ५० कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.
विषबाधेने या बिबट्यांचा आणि कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भोर परिसरातील नागरिकांनी भागात बिबट्याचा वावर होत असल्याच्या अनेक तक्रारी वन विभागाकडे केल्या होत्या. वनविभागाने या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत. तसेच वन विभागाने बिबट्या नसून अन्या प्राणी असल्याचे सांगत या हात झटकले होते.