शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चार आस्थापनांचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:10 AM2021-04-08T04:10:44+5:302021-04-08T04:10:44+5:30

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणाबाबतचे सुधारीत आदेशचे नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आंबेगाव ...

Suspension of four establishments for violating government order | शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चार आस्थापनांचे निलंबन

शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चार आस्थापनांचे निलंबन

Next

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणाबाबतचे सुधारीत आदेशचे नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यातील हॉटेल जीवन रेस्टॉरंट (एकलहरे, ता. आंबेगाव) (मालक सीताराम हिरामण नागवंशी), भैरवनाथ फर्निचर दुकान (पारगाव, ता. आंबेगाव) (मालक अविनाश राजेश ढोबळे), काठापुर बुद्रुक येथील पानटपरी दुकान (ता. आंबेगाव ) (मालक पार्वतीबाई सुदाम न्हरे), आरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट बार अँड लॉज (काठापूर बुद्रुक ता. आंबेगाव) (मालक निवृत्ती तुकाराम पवळे) या चार आस्थापना मालकांनी शासकीय आदेशाचा भंग करून आस्थापना चालू ठेवल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या अास्थापना सील करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे करत आहेत.

Web Title: Suspension of four establishments for violating government order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.