नव्या बांधकामांच्या परवानगीला स्थगिती
By admin | Published: November 14, 2014 12:31 AM2014-11-14T00:31:29+5:302014-11-14T00:31:29+5:30
न:हे-आंबेगाव दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातून इमारतीच्या सुधारित आराखडा (रिव्हाईज प्लॅन) मंजूर करण्यासाठी येणा:या सर्व फाईल सध्या थांबविण्यात आल्या आहेत.
Next
पुणो : न:हे-आंबेगाव दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातून इमारतीच्या सुधारित आराखडा (रिव्हाईज प्लॅन) मंजूर करण्यासाठी येणा:या सर्व फाईल सध्या थांबविण्यात आल्या आहेत. यापुढे सुधारित आराखडा मंजूर करताना स्ट्रक्चरल इंजिनिअरचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
राव यांनी सांगितले, की न:हे-आंबेगाव येथील दुर्घटनेनंतर शहरालगतच्या अनधिकृत बांधकामांचा सव्र्हे करण्यासाठी प्रांताधिका:यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात 56 टीम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने झपाटय़ाने बांधकाम होत असलेल्या भागातील गेल्या पाच वर्षातील सर्वच इमारतीची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित तपासणी टीमला एक आराखडा तयार करून दिला असून, यामध्ये अधिकृत, अनधिकृत, अंशत: अनधिकृत,
प्लॅन नुसार बांधकाम झाले का,
किती मजले अनधिकृत आहे आदी
सर्व गोष्टींची तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, यापुढे प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला आपल्या बांधकाम प्रकल्पावर संपूर्ण माहितीदर्शक फलक लावणो बंधनकारक करण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी विविध उपाय-योजना करताना अशा बांधकामांना पतपुरवठा करणा:या बँका आणि सहकारी पतसंस्थांनीदेखील खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात
आल्या असल्याचे राव यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
4शासनाने जिल्हाधिका:यांना नियोजन प्राधिकरण म्हणून जाहीर केले नसल्याने अधिकृत बांधकामांचा सव्र्हे झाला, तरी जिल्हाधिका:यांना ही बांधकामे पाडण्याचा अधिकार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांची वस्तुदर्शक माहितीचा अहवाल शासनाला सादर करून लवकरात लवकर नियोजन प्राधिकरणबाबतचा निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
न:हे-आंबेगाव येथील दुर्घटनेतील बांधकाम व्यावसायिक यांच्या आंबेगाव परिसरात सुरू असलेल्या अन्य चार बांधकाम प्रकल्पांचे काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले .
- सौरभ राव,
जिल्हाधिकारी