पीएमपीच्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

By admin | Published: July 13, 2016 12:58 AM2016-07-13T00:58:34+5:302016-07-13T00:58:34+5:30

स्वारगेट येथील पीएमपीच्या मुख्य इमारतीतील महिला स्वच्छतागृहात मोबाईलवर चित्रीकरण केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात

Suspension of two PMP employees | पीएमपीच्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

पीएमपीच्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Next

पुणे : स्वारगेट येथील पीएमपीच्या मुख्य इमारतीतील महिला स्वच्छतागृहात मोबाईलवर चित्रीकरण केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. सोमवारी ( दि.१२) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, या कर्मचाऱ्यांमधील एक कर्मचारी पीएमपीचा क्लीनर असून, दुसरा कर्मचारी शिकाऊ संगणक आॅपरेटर म्हणून काम करत आहे. यातील पीएमपीच्या कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी केली जाणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. या बाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते. त्याची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनीही आज दुपारी पीएमपी कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतरही या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून आले.
स्वारगेट येथील पीएमपीच्या मुख्य इमारतीमधील पहिल्या मजल्यावर महिला आणि पुरुषांसाठी शेजारी-शेजारी स्वच्छतागृह आहे. दोन्ही स्वच्छतागृहांमध्ये केवळ पार्टिशन आहे. तेथील एक महिला कर्मचारी स्वच्छतागृहात गेल्या असताना त्यांना पार्टिशनमधून एका गुलाबी रंगाच्या मोबाईलवर चित्रीकरण केले जात असल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित महिला आरडाओरडा करून शिपायाला बोलावण्यास गेल्या. तेवढ्या वेळेत कोणीतरी तो मोबाईल काढून घेऊन गेल्याचे आढळून आले. त्या वेळी तेथून जाणाऱ्या दोघांवर या महिला कर्मचाऱ्यांनी संशय व्यक्त केला होता. तसेच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांकडे कारवाई करण्याबाबत लेखी तक्रारही दिली होती. त्यानुसार, पीएमपीचा अतिरिक्त पदभार असलेले महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे प्रभारी सह व्यवस्थापकीय संचालक सुषमा कोल्हे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Suspension of two PMP employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.