धक्कादायक! चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला नदीपात्रात फेकले; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 05:51 PM2020-09-02T17:51:53+5:302020-09-02T17:52:24+5:30

चारित्र्याच्या संशयावरुन भांडणे करुन तुला मारुनच टाकतो, असे म्हणून पत्नीला पुलावरुन जमिनीवर फेकून दिले.

Suspicious of character, he threw his wife into the river in pune | धक्कादायक! चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला नदीपात्रात फेकले; पुण्यातील घटना

धक्कादायक! चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला नदीपात्रात फेकले; पुण्यातील घटना

Next

पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन एकाने आपल्या पत्नीला मारुन टाकण्यासाठी पुलावरुन नदी पात्रात फेकून दिले. त्यात ही महिला जखमी झाली आहे.
नागप्पा शिवाप्पा कुंभार (वय ३७, रा. म्हसोबा चौक, दत्तवाडी) याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणी त्याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, गेल्या एक महिन्यांपासून नागप्पा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला त्रास देत होता. त्यानंतर ३१ आॅगस्टला ते मुळ गावी जाण्यासाठी आरटीओ चौकाजवळील मुठा नदीपात्रातील होळकर घाटावर आले. तेथे नागप्पाने तिच्या चारित्र्याच्या संशयावरुन भांडणे करुन तुला मारुन टाकतो, असे म्हणून पत्नीला पुलावरुन नदीच्या बाजूला असलेल्या जमिनीवर फेकून दिले. पोलिसांनी नागप्पावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर यांनी सांगितले की, नागप्पाने आपल्या पत्नीला जवळपास ४५ फुटावरुन खाली फेकून दिले. सुदैवाने ती पडली तेथे चिखल असल्याने मोठी दुर्घटना झाली नाही. पत्नीच्या पाठीच्या मणक्याला मार बसला असून त्यांना उठून बसता येत नाही.

Web Title: Suspicious of character, he threw his wife into the river in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.