नीरा ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता महाश्रमदान अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:14 AM2021-09-17T04:14:29+5:302021-09-17T04:14:29+5:30
नीरा : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी शहरात स्वच्छता महाश्रमदान दिवस साजरा करण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने याबाबतचे आदेश ...
नीरा : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी शहरात स्वच्छता महाश्रमदान दिवस साजरा करण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने याबाबतचे आदेश ग्रामपंचायतींना दिले आहेत. यानुसार पुढील शंभर दिवस हे अभियान राबवण्यात येणार असल्याचे सरपंच तेजश्री काकडे यांनी सांगितले.
या वेळी नीरा ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेवक, जिल्हा परिषद शिक्षक, पोलीस व पत्रकार यांनी या श्रमदानातून भाग घेतला. नीरा ग्रामपंचायत ते पोलीस स्टेशन दरम्यानचा पालखी महामार्ग व बाजारतळाची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती गोरखनाथ माने, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, तंटामुक्ती अध्यक्ष नाना जोशी, ग्रामपंचायत सदस्य वैशाली काळे, राधा माने, माधुरी वाडेकर, सारिका काकडे, शशिकला शिंदे, वर्षा जावळे, अभिषेक भालेराव, संदीप धायगुडे, अनंता शिंदे, माजी उपसरपंच विजय शिंदे, मंगेश ढमाळ, सुजाता जाधव, पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागार, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल आगवणे, ग्रामसेवक मनोज डेरे, दामिनी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा संगीता जगताप यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच तेजश्री काकडे म्हणाल्या की, नीरा गावात पुढील शंभर दिवस विवध उपक्रम राबवत प्रत्येक प्रभागात स्वच्छता अभियान करणार आहे. पालखी मार्गावरील रेल्वे कंपाउंडच्या भिंतीवर आकर्षक रंगरंगोटी करून स्वच्छतेचे घोष वाक्य लिहिण्याची संकल्पना आहे. गावातील लोकांनी घराच्या व अंगणाच्या स्वच्छतेबरोबरच आपल्या आसपासचा परिसर ही स्वच्छ ठेवावा, तसेच कचरा घंटागाडीतच टाकावा.
१६नीरा
स्वच्छता महाश्रमदानात सहभागी झालेले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी.