स्वदेशी अस्मी ठरणार गेमचेंजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:50+5:302021-01-16T04:14:50+5:30

पुणे : सशस्त्र दलातील कमांडर्स त्याचबरोबर रणगाडे आणि विमानात तैनात असलेल्या जवानांसाठी वैयक्‍तिक शस्त्र म्हणून उपयुक्‍त ठरेल अशा ...

Swadeshi Asmi will be the game changer | स्वदेशी अस्मी ठरणार गेमचेंजर

स्वदेशी अस्मी ठरणार गेमचेंजर

googlenewsNext

पुणे :

सशस्त्र दलातील कमांडर्स त्याचबरोबर रणगाडे आणि विमानात तैनात असलेल्या जवानांसाठी वैयक्‍तिक शस्त्र म्हणून उपयुक्‍त ठरेल अशा स्वदेशी बनावटीचे ‘अस्मी’ हे पिस्तूल विकसित करण्यात शास्रज्ञांना यश आले आहे. लवकरच हे शस्र लष्कर आणि निमलष्करी दल यांच्या सेवेत दाखल होईल, अशी अपेक्षा लष्कर प्रशासनाने व्यक्‍त केली.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय लष्कराने संयुक्‍तपणे देशाची पहिली स्वदेश निर्मित ९ एमएम मशिन पिस्तूल विकसित केली आहे. लष्कराची मध्य प्रदेशातील महू येथील इन्फंट्री स्कूल आणि डीआरडीओच्या पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था (एआरडीई) यांनी हे पिस्तूल विकसित केले आहे. चार महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे शस्त्र विकसित करण्यात आले. मेटल थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने बनविलेल्या ट्रिगर घटकांसह विविध भागांच्या डिझाइनिंग आणि नमुन्यामध्ये थ्रीडी प्रिंटिंग प्रक्रिया वापरत हे शस्त्र बनविण्यात आले आहे.

सशस्त्र दलातील सैनिकांसाठी वैयक्‍तिक शस्त्रे म्हणून तसेच केंद्रीय आणि राज्य पोलीस संघटना तसेच व्हीआयपी संरक्षण आणि गस्त यामध्ये या पिस्तूलाचा वापर होण्याची शक्‍यता आहे. मशिन पिस्तूलाची उत्पादन किंमत प्रत्येकी ५० हजार रुपयांपेक्षा कमी असून याची निर्यातही केली जाणार आहे.

चौकट

अस्मि म्हणजे गौरव

‘अस्मि' याचा अर्थ गर्व, स्वाभिमान आणि कठोर परिश्रम होय. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून स्वालंबनाच्या दिशेने टाकलेले हे एक छोटे पाऊल आहे. सेवा आणि निमलष्करी दल (पीएमएफ) यामध्ये लवकरच याचा समावेश होईल, अशी अपेक्षा लष्कर प्रशासनाने व्यक्‍त केली आहे.

फोटो आहे

Web Title: Swadeshi Asmi will be the game changer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.