स्वामी चिंचोलीला कोविड सेंटरमध्ये नवीन १०० बेडची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:11 AM2021-05-06T04:11:25+5:302021-05-06T04:11:25+5:30
येथील कोविड सेंटरमध्ये पूर्वीचे १०० बेड होते. त्यात आणखी नवीन १०० बेडची भर पडली. त्यामुळे २०० बेडची ...
येथील कोविड सेंटरमध्ये पूर्वीचे १०० बेड होते. त्यात आणखी नवीन १०० बेडची भर पडली. त्यामुळे २०० बेडची क्षमता असलेले स्वामी चिंचोली हे दौंड तालुक्यातील सर्वात मोठे कोविड सेंटर झाले आहे.
दौंड तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कोविड सेंटरमध्ये बेड कमी पडत आहेत. त्यामुळे स्वामी चिंचोली कोविड सेंटरला बेड उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंडाईचे अध्यक्ष सतीश मगर यांच्याकडे केली होती. त्यानुसार मगर यांनी १०० काॅट, गादी, बेडशिट, सतरंज्या उपलब्ध करून दिल्या.
दरम्यान, या बेडचे लोकार्पण रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती सयाजी ताकवणे, पंचायत समिती सदस्य प्रकाश नवले, माजी उपसभापती उत्तम आटोळे, वैद्यकीय अधिकारी अपर्णा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.