पुरंदर हायस्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:10 AM2021-01-18T04:10:43+5:302021-01-18T04:10:43+5:30
प्रहार अपंग संघटनेचे कार्यकर्ते, संभाजी महामुनी यांच्या हस्ते बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ग्रंथ प्रदर्शनाचे ...
प्रहार अपंग संघटनेचे कार्यकर्ते, संभाजी महामुनी यांच्या हस्ते बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य हनीफ मुजावर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे, सलील महाराज जगताप, नदीम इनामदार तसेच इतर प्राध्यापक वृंद, आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. नीलेश जगताप यांनी पाचवी ते सातवी या गटातील गरजू हुशार होतकरू दोन विद्यार्थ्यांना डॉ. अभयकुमार साळुंखे यांच्या नावाने स्कॉलरशिप जाहीर केली असून १२ वी पर्यंत शैक्षणिक खर्च करणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्राध्यापक केशव काकडे, प्रा. राजेंद्र बढे यांनी कवितेतून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रा. अजय काळभोर, प्रा. हेमलता पोवार, प्रा. राजेश राणे, प्रा. रवीन जगदाळे, विजय खोमणे, संगीता काळभोर, वैशाली चव्हाण, बाळासाहेब झेंडे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक नम्रता गौंडाडकर यांनी केले. सूत्रसंचालन गजानन गोरवे यांनी केले. प्रा. मधुकर पवार यांनी आभार मानले.