संभाजीनगरचा जलतरण तलाव झाला खुला, राष्ट्रवादी आणि भाजपा कार्यकर्त्यांत घोषणाबाजी

By admin | Published: April 8, 2017 03:36 PM2017-04-08T15:36:29+5:302017-04-08T15:36:29+5:30

संभाजीनगर येथील जलतरण तलाव शनिवारी अखेर खुला झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या तलावाचे उद्घाटन झाले होते.

Swamiji Nagar Swimming Pool was opened, NCP and BJP workers boasted | संभाजीनगरचा जलतरण तलाव झाला खुला, राष्ट्रवादी आणि भाजपा कार्यकर्त्यांत घोषणाबाजी

संभाजीनगरचा जलतरण तलाव झाला खुला, राष्ट्रवादी आणि भाजपा कार्यकर्त्यांत घोषणाबाजी

Next
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 8 - संभाजीनगर येथील जलतरण तलाव शनिवारी अखेर खुला झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या तलावाचे उद्घाटन झाले होते. मात्र काहीतरी सबबी पुढे करून नागरिकांसाठी तलाव खुला करण्यास विलंब केला जात होता. उन्हाळा सुरू झाल्याने तलाव नागरिकांसाठी खुला करावा.अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागल्याने उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तलाव खुला करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मंगला कदम यांच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध या घटनेचा निषेध नोंदविला. भाजपा कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. 
फेब्रुवारी २०१७ ला महापालिका निवडणूक असल्याने राष्ट्रवादी काँगे्रसने २१ डिसेंबर २०१६ ला घाईघाईत तलावाचे उद्घाटन केले होते. उद्घाटनाची घाई केली मात्र तलाव खुला करण्याच्या हालचाली होत नव्हत्या. निवडणुकीत  राष्टÑवादीची सत्ता गेली. भाजपाने बहुमत मिळवुन सत्ता काबीज केली.  उन्हाळा सुरू झाला असताना, बांधून तयार असलेला तलाव खुला होत नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यकत केला होता, त्यामुळे भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी तलाव खुल करण्याचे पत्र प्रशासनास दिले होते. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने भाजपाने पुढाकार घेऊन शनिवारी तलाव खुला केला.  एकदा उद्घाटन झाले असताना, दुसºयांदा उद्घाटन करणे म्हणजे दुसºयाने केलेल्या कामाचे श्रेय लाटणे असा प्रकार असल्याची टिका राष्ट्रवादीच्या मंगला कदम यांनी केली. तसेच या घटनेचा काळे झेंडे दाखवत निषेध केला. सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले , जलतरण तलावाचे निवडणुकीच्या घाई गडबडीत उद्घाटन केले होते. निवडणुकीनंतरही हा तलाव बंदच होता. तलाव बांधून तयार आहे, मग या सुविधेसाठी नागरिकांना प्रतियेत ठेवण्याचे कारण काक्ष? श्रेय वादाचा प्रश्न उद्भवत नाही, नागरिकांसाठी आहे, ते नागरिकांसाठी खुले केले. कोणाची खासगी मालमत्ता अथवा मक्तेदारी नाही. हे लक्षात घ्यावे.

Web Title: Swamiji Nagar Swimming Pool was opened, NCP and BJP workers boasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.