स्वरभास्कर पुरस्कार प्रभा अत्रे यांना जाहीर
By admin | Published: June 14, 2014 01:19 AM2014-06-14T01:19:06+5:302014-06-14T01:19:06+5:30
पंडित भीमसेन जोशी यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या स्वरभास्कर पुरस्कारासाठी या वर्षी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांची निवड करण्यात आली आहे
पुणे : पंडित भीमसेन जोशी यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या स्वरभास्कर पुरस्कारासाठी या वर्षी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांची निवड करण्यात आली आहे. एक लाख अकरा हजार रुपये, शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बालगंधर्व पुरस्काराचा सन्मान कथ्थक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांना देण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये रकमेचा धनादेश, शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यापूर्वी हा पुरस्कार जयमाला शिलेदार, ज्योत्स्ना भोळे, शरद तळवलकर, उस्ताद फय्याज हुसेन खॉँ इत्यादींना देण्यात आला आहे.
या पुरस्काराबरोबरच शिवराज वायचळ (दिग्दर्शन), सदाशिव
कांबळे (वेशभूषा), गिरीश गोडबोले (बुकिंग), राजेश वाघ (प्रकाशयोजना), श्रुती कुमार करंदीकर (गझलगायन) यांचाही प्रत्येकी ११ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार
आहे. (प्रतिनिधी)