Pune: स्वारगेट ,भवानी पेठ परिसरात 'हे' पंधरा दिवस एक वेळ पाणी पुरवठा

By राजू हिंगे | Published: January 5, 2024 07:24 PM2024-01-05T19:24:42+5:302024-01-05T19:26:25+5:30

नव्याने टाकलेल्या १४७३ मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण केले जाणार

Swargate Bhawani Peth area fifteen days one time water supply in pune | Pune: स्वारगेट ,भवानी पेठ परिसरात 'हे' पंधरा दिवस एक वेळ पाणी पुरवठा

Pune: स्वारगेट ,भवानी पेठ परिसरात 'हे' पंधरा दिवस एक वेळ पाणी पुरवठा

पुणे : पर्वती येथील एमएलआर टाकी वरून ते जगताप हाऊस दरम्यान नव्याने टाकलेल्या १४७३ मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण केले जाणार आहे. भवानी पेठ स्वारगेट परिसर शंकर शेठ रस्ता या भागासाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था ८०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात ८ जानेवारी ते २२ जानेवारी कालावधीत एक वेळा पाणीपुरवठा केला जाणार आहे.

एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येणारा भाग पुढील प्रमाणे 

स्वारगेट पोलीस वसाहत, झगडेवाडी, खडकमाळ आळी, संपूर्ण घोरपडी पेठ, मोमिनपुरा, टिंबर मार्केट, महात्मा फुले पेठ, गंजपेठ, गुरुवार पेठ, धोबी घाट, खडक पोलीस वसाहत, लोहिया नगर, इनामकेमळा, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, काशिवाडी, गुरुनानकनगर, नेहरू रस्ता, संपूर्ण भवानी पेठ परिसर, बालाजी व भवानी माता मंदिर परिसर, नवीन नाना पेठ, हरकानगर, चुडामण तालीम इत्यादी भागभगवान दास चाळ, वायमेकर चाळ, राजेवाडी,पत्राचाळ एसआरए, भवानी पेठ पोलीस वसाहत, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, पद्मजी सोसायटी परिसर, महीफिल वाडा, साठेवाडा, रमेश फर्निचर परिसर, सायकल सोसायटी, मुकुंदनगर, व्हेईकल डेपो, अप्सरा टॉकीज परिसर, टिळक महाराष्ट्रविद्यापीठ, सीपीएडबल्यू क्वार्टर, रांका हॉस्पिटल परिसर, शंकरशेठ रस्ता एसटी बस स्थानक ते धोबी घाट परिसर उजवी बाजू, मीरा सोसायटी, लक्ष्मी नारायण चौकीच्या मागील वस्ती, मित्र मंडळ कॉलनी.

Web Title: Swargate Bhawani Peth area fifteen days one time water supply in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.