स्वारगेट प्रकरण : पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू; दत्तात्रय गाडे ऊसाच्या शेतात लपला असल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 14:17 IST2025-02-27T14:16:52+5:302025-02-27T14:17:38+5:30

पुणे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे.

Swargate case: Police start drone imaging Dattatreya Gade is likely hiding in a sugarcane field | स्वारगेट प्रकरण : पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू; दत्तात्रय गाडे ऊसाच्या शेतात लपला असल्याची शक्यता

स्वारगेट प्रकरण : पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू; दत्तात्रय गाडे ऊसाच्या शेतात लपला असल्याची शक्यता

- किरण शिंदे

पुणे -स्वारगेट बसस्थानकातील धक्कादायक प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याच्या शोधासाठी पुणेपोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. शिरूर येथील ऊसाच्या शेतात तो लपल्याची शक्यता असल्याने, पोलिसांनी तेथे ड्रोनद्वारे इमेजिंग सुरू केले आहे.

गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून शोधमोहीम

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांनी शिरूरमध्ये गाडेचा शोध सुरू केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तो ऊसाच्या शेतात लपल्याची शक्यता असल्याने, त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

आरोपीचा फोन घटना घडल्यापासून बंद

घटना घडल्यानंतर दुपारी २ वाजल्यापासून गाडे याचा फोन बंद आहे. त्याने थेट आपल्या गावाकडे, शिरूरकडे पळ काढल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, दत्ता गाडे आणि त्याचा सख्खा भाऊ दिसायला सारखे असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.

आरोपीवर आधीपासून गंभीर गुन्हे दाखल

दत्तात्रय गाडे याच्यावर यापूर्वी शिक्रापूर येथे २ गुन्हे तसेच शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शिरूरमध्ये पोलिसांकडून वेगाने शोधमोहीम सुरू असून, लवकरच आरोपी गाडेला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Swargate case: Police start drone imaging Dattatreya Gade is likely hiding in a sugarcane field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.