पालिकेच्या अनास्थेमुळे स्वारगेट जंक्शन रखडले

By admin | Published: November 20, 2015 03:28 AM2015-11-20T03:28:38+5:302015-11-20T03:28:38+5:30

पीएमपी, बीआरटीपासून ते मेट्रो, मोनोरेल अशा सर्वच सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे देशातील पहिला इंटर मॉडेल ट्रान्झिट सेंटर (आयएमटीसी) स्वारगेट येथे उभारण्याचा

Swargate junction halted due to the anomaly of the corporation | पालिकेच्या अनास्थेमुळे स्वारगेट जंक्शन रखडले

पालिकेच्या अनास्थेमुळे स्वारगेट जंक्शन रखडले

Next

पुणे : पीएमपी, बीआरटीपासून ते मेट्रो, मोनोरेल अशा सर्वच सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे देशातील पहिला इंटर मॉडेल ट्रान्झिट सेंटर (आयएमटीसी) स्वारगेट येथे उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महापालिकेला दिला होता. मात्र, महापालिका प्रशासनाने यासाठी पुढाकार न घेतल्याने हा प्रकल्प रखडला आहे, त्याचवेळी बंगळुरू महापालिकेने अशा प्रकारचा प्रकल्प उभारून बाजी मारली आहे.
एसटी बसस्थानक, पीएमपी वर्कशॉपचे डेपो, तसेच अनेक शासकीय कार्यालये आहेत. एसटी बसच्या हजारो फेऱ्या या चौकातून होतात, त्याचबरोबर कात्रज, हडपसर येथून येणारे मुख्य रस्ते या चौकात मिळत असल्याने याठिकाणी वाहतुकीची मोठी वर्दळ असते. याठिकाणची वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी इंटर मॉडेल ट्रान्झिट सेंटर उभारण्याचा प्रस्ताव रस्ते महामंडळाने दिला होता.
आयएमटीसी प्रकल्पासाठी ६ हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. तो खर्च खाजगी सहभागातून करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेबरोबर एसटी महामंडळ, पीएमपी व महापालिकेची जागा लागणार आहे. पुणे महापालिकेने या प्रकल्पातील उडडणपुलाच्या व्यतिरिक्त इतर प्रकल्प करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाशी महापालिकेने त्यानंतर अद्याप संपर्क साधला नसल्याची माहिती उजेडात आली आहे.
स्वारगेट परिसरातील एसटी, पीएमपी, वॉटरपार्कची सर्व २३ एकर जागा ताब्यात घेऊन याठिकाणी वाहतुकीचा एकत्रित आराखडा तयार केला जाणार होता. सध्या स्वारगेट चौकात बांधण्यात येत असलेले उडडणपूल हे देखील याच प्रकल्पाचा एक भाग आहेत. आयएमटीसीचा आराखडयानुसारच सध्या उडडणपुलांची उभारणी केली जात आहे. उडडणपुलाचे काम जानेवारी २०१६ पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे, मात्र उर्वरित प्रकल्प मात्र रखडला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये पहिल्या २० शहरामध्ये समावेश होण्यासाठी पालिकेकडून धडपड केली जात असताना देशातील पहिला स्मार्ट चौक उभारण्याचा मान मात्र पालिकेच्या असहकारामुळे मिळू शकलेले नाही.

Web Title: Swargate junction halted due to the anomaly of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.