स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्ग भुयारीच होणार: ब्रिजेश दीक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 05:33 PM2019-06-20T17:33:24+5:302019-06-20T17:36:10+5:30
महामेट्रोमार्गाबाबत दोन ते तीन पर्याय होते त्यातला भूयारी मार्गाचा पर्याय अंतिम झाला नसला तरी निश्चित करण्यात आला आहे
नागपूर: स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग भुयारीच करण्याचा निर्णय झाला आहे. यासाठीच्या खर्चातील काही भाग पालिकेने घ्यावा अशी महामेट्रोची अपेक्षा असून त्याबाबत महामेट्रोने पालिकेकडे विचारणा केली आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित नागपूर येथे याबाबतीत माहिती देताना म्हणाले, या मार्गाबाबत दोन ते तीन पर्याय होते त्यातला भूयारी मार्गाचा पर्याय अंतिम झाला नसला तरी निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी येणारा खर्च कसा उभा करायचा यावर अभ्यास सुरू आहे. केद्र सरकार राज्य सरकार महापालिका व कर्ज असे काही पर्याय आहेत. भुयारी मार्गाचा खर्च 3 हजार 600 कोटी व उन्नत मार्गाचा 1 हजार 600 कोटी आहे. केंद्र सरकार 50 टक्केवारी राज्य सरकार 30 टक्के व पालिका 20 टक्के अशी विभागणी होती, मात्र राज्य सरकारने काहीही हिस्सा देणार नाही असे सांगितले म्हणून पालिकेने खर्च द्यावा अशी विचारणा केली आहे. वार्षिक काही देण्याची त्यांनी तयारी दाखवली मात्र तसे लेखी काही नाही. निधी उभा करण्याचा निर्णय नक्की झाला की याबाबत अंतिम निर्णय होईल.
स्वारगेट ते कात्रज हा मार्ग भूयारी व्हावा यासाठी पालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले प्रयत्न करत होते. तसा निर्णय झाला असला तरी राज्य सरकारने आर्थिक साह्य नाकारल्याने पुन्हा आता निधीवरून संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
50 टक्के केंद्र सरकार, राज्य सरकार 30 20 टक्के पालिका 20 टक्के असे गणित बिघडल्याने आता पालिकेवर जास्त आर्थिक बोजा पडणार आहे. त्यामुळे केंद सरकार, वित्तीय संस्था( कर्ज) व पालिका असा पर्याय अभ्यास करण्यात येत आहेत. कर्जाची हमी देण्याची जबाबदारीही पालिकेवरच येणार आहे.