स्वारगेट प्रकरणातील मोठी अपडेट..! २५ फेब्रुवारीला काय घडलं? तरूणीने इन कॅमेरा जबाब नोंदवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 17:36 IST2025-03-04T17:33:20+5:302025-03-04T17:36:56+5:30
पीडित तरूणीचाही न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला आहे. तरूणीनं हा जबाब इन कॅमेरामध्ये नोंदवला आहे.

स्वारगेट प्रकरणातील मोठी अपडेट..! २५ फेब्रुवारीला काय घडलं? तरूणीने इन कॅमेरा जबाब नोंदवला
- किरण शिंदे
पुणे : शहरातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे दत्तात्रय गाडे या नराधमाने २६ वर्षीय पीडितेवर बलात्कार केला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे पोलिसांवरही फरार असलेल्या गाडेच्या अटकेसाठी मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर तीन दिवसांनी पोलिसांनी दत्ता गाडे याला ताब्यात घेतलं. मात्र आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या विविध दाव्यांमुळे या प्रकरणातील सत्य समोर आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाल आहे.
दरम्यान,या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणीचाही न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला आहे. तरूणीनं हा जबाब इन कॅमेरामध्ये नोंदवला आहे. हा जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला. तरुणीने या जबाबात स्वारगेट येथे २५ फेब्रुवारीला नेमक काय प्रकार घडला? याबाबत सांगतले आहे. या जबाबात तिच्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला हे सविस्तरपणे मांडण्यात आले आहे
यापूर्वी, आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांनी जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच रूग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे. डेपोच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना २५ फेब्रुवारीला घडली होती.
स्थानकाच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना २५ फेब्रुवारीला घडली तरुणीवर अत्याचार करून पसार झालेल्या गाडे याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे पोलिस कोठडीत असलेल्या गाडेचा जबाब शनिवारी पोलिसांकडून नोंदविण्यात आला होता.
तत्पूर्वी, पीडित तरुणीचे वकील असीम सरोदे म्हणाले, वृत्तपत्र स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी न्यायालयात घडलेल्या घटनांचे वृत्तांकन केले पाहिजे. परंतु काही राजकारणी, अधिकारी आदी काही व्यक्ती खोट्या बातम्या पसरवत आहेत. न्याय मागण्यासाठी अर्ज करणाऱ्या पीडितेचे चारित्र्यहनन केले जात आहे.