स्वारगेटलाही मिळणार पास

By admin | Published: October 12, 2016 02:16 AM2016-10-12T02:16:54+5:302016-10-12T02:16:54+5:30

: प्रवाशांच्या पसंतीला पडलेला आणि पीएमपीच्या महसुलात भर घालणारा एकदिवसीय ५० रुपयांचा पीएमपीचा पास आता स्वारगेट एसटी स्टँडमध्येही

Swargate will also get close | स्वारगेटलाही मिळणार पास

स्वारगेटलाही मिळणार पास

Next

कोंढवा : प्रवाशांच्या पसंतीला पडलेला आणि पीएमपीच्या महसुलात भर घालणारा एकदिवसीय ५० रुपयांचा पीएमपीचा पास आता स्वारगेट एसटी स्टँडमध्येही मिळणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात चालणाऱ्या ५० रुपयांच्या एकदिवसीय पास केंद्राचे उद्घाटन स्वारगेट एस. टी. स्टँड आवारात सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे, जनरल मॅनेजर अनंत वाघमारे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या वेळी एसटी महामंडळाचे विभाग अधिकारी, डेपो मॅनेजर, पीएमपीएमएल कामगार जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड, स्वारगेट डेपो मॅनेजर राजेश कुदळे व पीएमपीएमएल इंटक कर्मचारी संघटनेचे अशोक जगताप उपस्थित होते. पुणेकरांसह बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना पासची माहिती व्हावी, हा या मागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Swargate will also get close

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.