स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशनकडून१०० कुटुंबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:10 AM2021-05-25T04:10:58+5:302021-05-25T04:10:58+5:30
यामुळे १०० भूमिहीन शेतमजूर तसेच बांधकाम रोजंदार, इतर मोलमजूर कामगारांच्या १ महिन्यांच्या किराण्याचा प्रश्न सुटला आहे. स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशनच्या ...
यामुळे १०० भूमिहीन शेतमजूर तसेच बांधकाम रोजंदार, इतर मोलमजूर कामगारांच्या १ महिन्यांच्या किराण्याचा प्रश्न सुटला आहे.
स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशनच्या तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक गरज ओळखून धान्य व किराणा गरजूंच्या घरी जाऊन वाटप केले. यामध्ये बाजरी, बेसन पीठ, साखर, शेंगदाणे, तेल, तूरडाळ, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हळद पावडर, राजमा, वाटाणा, मटकी, चवळी, हरभरा, जिरे, मोहरी अशा वस्तूंचे वाटप केले. शंभर कुटुंबाला एक महिने पुरेल असा किराणा देण्यात आला. स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशनच्या तरुणांनी पैसे जमा करून हे योगदान दिले. फाउंडेशनच्या तरुणांची ही परिस्थिती बेताची असली तरी आपल्या घासातील घास या तरुणांनी काढून गरिबांसाठी दान देण्याचे ठरवले. ज्याला जसे शक्य होईल त्याने तेवढे पैसे जमा केले. यापुढेही अनेक गरजू व्यक्तींना अशाप्रकारे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी इतर दात्यांनादेखील दान करण्याचे आवाहनही केले आहे. या आधी या फाउंडेशनच्या वतीने वृक्षलागवड, विद्यार्थी दत्तक घेणे, मास्क व अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप यांसारख्या अनेक माध्यमातून मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. फाउंडेशनच्या तरुणांचे परिसरातून कौतुक होत आहे.
२४ बेल्हा
बेल्हा (ता. जुन्नर) गरजूंसाठी जमा केलेला किराणा देताना स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशनचे कार्यकर्ते.