ई-पास काढण्यासाठी दाखला दिला नाही म्हणून शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:08 AM2021-04-26T04:08:58+5:302021-04-26T04:08:58+5:30
सतीश रमाकांत बनकर (रा. वारूळवाडी, ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय ...
सतीश रमाकांत बनकर (रा. वारूळवाडी, ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. आभा योगेंद्र त्रिपाठी (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे.
ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार: सतीश बनकर हे शनिवारी (दि. २५) रोजी सायंकाळी ४.३० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले आणि मला ई-पास काढायचा आहे असे सांगितले. यावर डॉ. आभा त्रिपाठी यांनी बाह्यरुग्ण विभागाची वेळ संपली आहे. आता तुम्हाला ई-पास देता येणार नाही असे सांगून तुम्ही आमचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी आल्यानंतर त्यांना भेटा असे सांगितले. बनकर हे तेथे थोडावेळ थांबले परंतु प्रभारी वैद्यकीय अधिकारी लवकर न आल्याने चिडून जाऊन बनकर यांनी डॉ. आभा त्रिपाठी व आरोग्य केंद्रातील कर्मचा-र्यांना शिवीगाळ, दमदाटी करून हे हॉस्पिटल तुमच्या बापाचे आहे काय, असे म्हणून डॉ. त्रिपाठी यांच्या अंगावर धावून जाऊन तुझे थोबाड फोडीन, असा दम देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या गुन्ह्याचा पुढील महिला पोलीस हवालदार घोडे या करीत आहे.