सफाई कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे वेतनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:06+5:302021-06-30T04:09:06+5:30

पुणे : कोविड काळात झाडणकामासह स्वच्छतेची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. हक्काचे वेतन ...

Sweepers are not paid for three months | सफाई कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे वेतनच नाही

सफाई कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे वेतनच नाही

Next

पुणे : कोविड काळात झाडणकामासह स्वच्छतेची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. हक्काचे वेतन मिळावे याकरिता झाडणकाम करणाऱ्या कामगारांनी धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात धरणे आंदोलन केले.

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाने कोविड काळात कलम ६७ (३) क अंतर्गत झाडणकामाचे कंत्राट एका ठेकेदाराला दिले. या ठेकेदाराकडे कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे देखील काम आहे. फेब्रुवारीपासून झालेल्या कामाचे पैसे कामगारांना मिळालेले नव्हते. दरम्यान, यातील दोन महिन्यांचे वेतन कामगारांना देण्यात आले. परंतु, अद्याप तीन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही.

ठेकेदाराला विनानिविदा काम देण्यात आले होते. त्यामुळे पालिकेकडून ठेकेदाराला अद्याप बिल अदा करण्यात आलेले नाही. हे प्रकरण आयुक्तांच्या मान्यतेकरिता पाठविण्यात आलेले आहे. ती मान्यता मिळताच ठेकेदाराची बिले अदा केली जाणार असल्याचे क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या ठेकेदाराला १ जून रोजी कार्यादेश देण्यात आलेले आहेत. कामगारांना येत्या सोमवारी वेतन देण्याचे आश्वासन ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

------------------

फोटो : जेएम एडिटवर पाठविला आहे.

Web Title: Sweepers are not paid for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.