सफाई कामगारांचा 'क्लीन इंडिया वॉरियर योद्धे' म्हणून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:11 AM2021-04-23T04:11:21+5:302021-04-23T04:11:21+5:30
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी सफाई कामगार सर्वांत पुढे राहून आपले काम चोखपणे बजावत आहेत. तर, आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ...
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी सफाई कामगार सर्वांत पुढे राहून आपले काम चोखपणे बजावत आहेत. तर, आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव माझी वसुंधरा योजना प्रभावीपणे राबवित असताना त्यांनाही या कामात सफाई कामगार मदत करत आहेत. सफाई व स्वच्छतेच्या माध्यमातून समाजात एका अर्थाने पर्यावरणाचे रक्षण सुद्धा त्यांच्याकडून होत असते. यापार्श्वभूमीवर जागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने संघाच्या वतीने सफाई कामगारांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी आळंदीचे माजी नगराध्यक्ष व जैन श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, जैन संघाचे विश्वस्त राजू धोका, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, आळंदी नगरपालिकेच्या 'माझी वसुंधरा' योजनेच्या समन्वयक भाग्यश्री वाघ व आरोग्य निरीक्षक हनुमंत लोखंडे, भागवत सोमवंशी विलास पवार उपस्थित होते.
२२ आळंदी
तीर्थक्षेत्र आळंदीतील सफाई कामगारांचा गौरव करताना मान्यवर.