गडचिरोलीच्या आदिवासी बांधवांची दिवाळी गोड, पुण्यातून फराळासह साहित्य रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 02:53 AM2018-11-06T02:53:36+5:302018-11-06T02:53:53+5:30

पुणे शहरात दिवाळीचा झगमगाट असताना दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांची दिवाळीही गोड व्हावी, यासाठी पुणे पोलीस व मार्केट यार्ड, बिबवेवाडी येथील व्यापाºयांनी एकत्र येऊन एक अभिनव उपक्रम राबविला.

sweet for tribal brothers of Gadchiroli departed from Pune | गडचिरोलीच्या आदिवासी बांधवांची दिवाळी गोड, पुण्यातून फराळासह साहित्य रवाना

गडचिरोलीच्या आदिवासी बांधवांची दिवाळी गोड, पुण्यातून फराळासह साहित्य रवाना

Next

पुणे -  शहरात दिवाळीचा झगमगाट असताना दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांची दिवाळीही गोड व्हावी, यासाठी पुणे पोलीस व मार्केट यार्ड, बिबवेवाडी येथील व्यापाºयांनी एकत्र येऊन एक अभिनव उपक्रम राबविला़
गडचिरोली येथील आदिवासी बांधवांसाठी दिवाळी फराळ तसेच मुलांसाठी पेन्सिल, वह्या, पेन, ब्लँकेट असे साहित्य भरून एक ट्रक शनिवारी पुण्यातून रवाना केला़ पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम यांनी या ट्रकला हिरवा झेंडा दाखविला़ सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, रवींद्र सेनगावकर व व्यापरी उपस्थित होते़ ही मदत गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयात जाणार असून त्यांच्यामार्फत ती संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना वितरित होईल़
यासाठी मदत केल्याबद्दल पोलीस आयुक्त डॉ़ व्यंकटेशम यांच्या हस्ते फेडरेशन आॅफ असोशिएशन आॅफ महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला़

Web Title: sweet for tribal brothers of Gadchiroli departed from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.