ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला; साखर महाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:13 AM2021-08-13T04:13:58+5:302021-08-13T04:13:58+5:30
(स्टार १०४१ डमी) पुणे : मागील तीन ते चार वर्षांत साखरेचे उत्पादन चांगले झाले आहे. बाजारात ही साखर चांगल्या ...
(स्टार १०४१ डमी)
पुणे : मागील तीन ते चार वर्षांत साखरेचे उत्पादन चांगले झाले आहे. बाजारात ही साखर चांगल्या भावात विकली जात आहे. तसेच सध्या साखरेला शासनाकडून सबसिडी दिली जात आहे. मात्र, नजीकच्या काळात शासन सबसिडी कमी करू शकते. परिणामी राज्यात सणासुदीच्या काळात साखरेचे भाव वाढू शकतात. सध्या साखर किरकोळ बाजारात ३८ रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे.
दरवर्षी श्रावण सुरू झाल्यावर सणासुदीमुळे साखरेची मागणी वाढल्याच पाहायला मिळते. तसेच साखरेच्या दरात वाढ होत असते. मागील तीन-चार वर्षांत उत्पादन चांगले आहे. मात्र, त्या तुलनेत साखरेची मागणी देखील सातत्याने वाढत आहे. उसाचे भाव वाढले आहेत, त्याचबरोबर घरगुती वापर जास्त वाढल्याने मागील दोन-वर्षांपासून साखरेचे भाव सातत्याने वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
------
* असे वाढले साखरेचे भाव (प्रति कि्वंटल)
वर्ष साखर
२०१७ ३१००-३२५०
२०१८ ३२००-३३००
२०१९ ३२५०-३३००
२०२० ३३००-३३५०
२०२१ ३३००-३३५०
-----
* का वाढले भाव?
साखरेचे दर निश्चित केलेले आहे. त्यात राज्य शासनाचा कोटा ठरलेला आहे. कोरोना प्रादुर्भाव, लॉकडाऊन यामुळे मागील दोन वर्षांपासून भाव तेजीत आहेत. मागील दहा वर्षांत अनेक बदल झाले आहेत. ग्रामीण भागात अनेकांना गुळाच्या तुलनेत साखर आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याने लोक जास्त करून साखर वापरतात. त्यामुळे देखील साखरेच्या दरात वाढ असे पुण्यातील होलसेल बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
------
* महिन्याचे बजेट वाढले
मागील वर्षाभरापासून कोरोनामुळे आधीच दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे भाव वाढले आहेत. तेलाचे भाव तर गगनाला भिडले आहेत. त्यातच आता साखरेचे दरही मागील आठ-दहा महिन्यांपासून वाढत आहे. त्यामुळे घर चालवताना कसरत करावी लागत आहे.
- हौसाबाई ठोंबरे, गृहिणी