Pune: मंगला थिएटरच्या बाहेर तलवार, कोयत्याने वार; दहा ते बारा जणांकडून एकाचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 09:29 AM2023-08-16T09:29:54+5:302023-08-16T09:34:03+5:30

पुण्यातील मंगला थिएटरमधून गदर चित्रपट पाहून झाल्यावर बाहेर आल्यावर खून करण्यात आला

Swords, spears outside Mangala Theatre; Brutal murder of one by ten to twelve people | Pune: मंगला थिएटरच्या बाहेर तलवार, कोयत्याने वार; दहा ते बारा जणांकडून एकाचा निर्घृण खून

Pune: मंगला थिएटरच्या बाहेर तलवार, कोयत्याने वार; दहा ते बारा जणांकडून एकाचा निर्घृण खून

googlenewsNext

किरण शिंदे 

पुणे : पुण्यात शिवाजीनगर परिसरातील मंगला थेटर च्या बाहेर दहा ते बारा जणांनी तलवार आणि कोयत्याने वार करत एका तरुणाचा निर्घृण खून केला. बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नितीन म्हस्के असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सागर कोळणटी, मलिक कोल्या, इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सुर्यवंशी, बाबा आवले, आकाश गायकवाड (सर्वजण राहणार ताडीवाला रोड) या सर्वांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश आनंदा वानखेडे (वय 34, ताडीवाला रोड खड्डा झोपडपट्टी जनसेवा तरुण मंडळाजवळ पुणे) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन म्हस्के याचे काही दिवसांपूर्वी कोरेगाव पार्क परिसरातील एकासोबत भांडण झाले होते. त्यावेळी म्हस्के याने आरोपी पैकी एकावर हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी म्हस्केचा खून करायचे ठरवले.  नितीन म्हस्के हा काल रात्री पुण्यातील मंगला टॉकीजमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्याने गदर चित्रपट पाहिला. चित्रपट रात्री 1 वाजता संपल्यानंतर म्हस्के बाहेर पडला आणि त्यावेळी 10 ते 12 जणांनी त्याला घेरले. हातात असलेल्या तलवार, पालघन, काठ्या, लोखंडी गज याचा वापर करत  म्हस्केवर सपासप वार केले. वार करून हे सर्व त्या ठिकाणाहून फरार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या म्हस्केचा यामध्ये मृत्यू झाला.

Web Title: Swords, spears outside Mangala Theatre; Brutal murder of one by ten to twelve people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.