हिंदू देवदेवतांविषयीचं वक्तव्य प्राध्यापकाला भोवलं, थेट निलंबनाची कारवाई आणि अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 07:20 PM2023-08-03T19:20:31+5:302023-08-03T19:21:03+5:30

हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाल अखेर कॉलेजमधून निलंबित, तर डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल करून अटक

Symbiosis professor's remarks about Hindu gods lead to immediate suspension and arrest | हिंदू देवदेवतांविषयीचं वक्तव्य प्राध्यापकाला भोवलं, थेट निलंबनाची कारवाई आणि अटक

हिंदू देवदेवतांविषयीचं वक्तव्य प्राध्यापकाला भोवलं, थेट निलंबनाची कारवाई आणि अटक

googlenewsNext

पुणे : शिक्षकांनी विद्यार्थ्याना शिकवताना काळजीपूर्वक शिकवले पाहिजे, कारण एखादं चुकीचं उदाहरण सबंधित शिक्षकाला किती महागात पडू शकतं याचाच प्रत्यय नुकताच पुण्यात आलाय. पुण्यातील सिम्बायोसिस महाविद्यालयात हा प्रकार घडलाय. हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाल अखेर कॉलेजमधून निलंबित कऱण्यात आलं आहे. अशोक ढोले असं या प्राध्यापकाचं नाव आहे. सिंबायोसिस कॉलेजमध्ये  विद्यार्थ्यांना शिकवत असताना प्राध्य़ापकांनी हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माच्या देवदेवतांचं उदाहरण देत प्राध्यापकांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप हिंदू संघटनानी  केला.  

प्राध्यापकाचा शिकवतानाच व्हिडिओ समोर आला होता ज्यात हे वादग्रस्त विधान आहे,  हा व्हिडीओ पाहून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता, प्राध्यापकांच्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर, आणि पोलिसांना मिळाल्यानंतर ही प्राध्यापकावर गुन्हा दाखल झाला नसल्याने अभा विप ने जोरदार आंदोलन केले. अखेर डेक्कन पोलिसांनी अशोक ढोले या शिक्षकावर भारतीय दंडात्मक कलम २९५ अंतर्गत गुन्हा दखल करून अटक केली आहे.

Web Title: Symbiosis professor's remarks about Hindu gods lead to immediate suspension and arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.