नागापूर शाळेला ठोकले टाळे
By admin | Published: March 22, 2017 03:01 AM2017-03-22T03:01:17+5:302017-03-22T03:01:17+5:30
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गैरकारभाराला कंटाळून येथील ग्रामस्थांनीच अखेर शाळेला टाळे ठोकले़ गेल्या पाच
निरगुडसर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गैरकारभाराला कंटाळून येथील ग्रामस्थांनीच अखेर शाळेला टाळे ठोकले़ गेल्या पाच दिवसांपासून संबंधित खात्याने तक्रारीची दखल न घेतल्याने पालकांनी ही भूमिका घेतली व मुलांना शाळेतून घरी नेले आणि शाळाबंद आंदोलन पुकारले़
नागापूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत़ मागील काही दिवसांपासून शाळेत गैरकारभार सुरू असल्याबाबत ग्रामस्थांनी शिक्षणविभागाकडे तक्रार केली होती़ परंतु, प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने पाच दिवसांपूर्वी शाळेच्या कारभाराला कंटाळून पालकांनीच आपल्या मुलांना शाळेतून घरी नेले होते़
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले़
पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन चौकशीचे आश्वासन दिले़ परंतु, शिक्षण विभागाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनीच अखेर शाळेला टाळे ठोकले़ जोपर्यंत शाळेच्या गैरकारभाराची चौकशी केली जात नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे़
या वेळी बाजारसमितीचे सभापती देवदत्त निकम, गणेश यादव, प्रमोद पवार, डॉ़ संजय भोर, गणेश म्हस्के, सुनील शिंदे, सूर्यकांत भागवत, कैलास पवार, रमेश पोहकर, श्रीहरी पवार, विलास धनगरमाळी व ग्रामस्थ उपस्थित होते़
(वार्ताहर)