तडीपार गुंडाला समर्थ पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:09 AM2021-01-18T04:09:40+5:302021-01-18T04:09:40+5:30
समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते व पोलीस शिपाई हेमंत पेरणे व विठ्ठल चोरमले हे पेट्रोलिंग ...
समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते व पोलीस शिपाई हेमंत पेरणे व विठ्ठल चोरमले हे पेट्रोलिंग करीत असताना पेरणे यांना सागर नायडू हा शाहू उद्यानजवळ उभा असल्याची माहिती मिळाली. तपास पथकातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांना पाहून सागर पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. समर्थ पोलीस ठाण्यातून त्याला २६ मार्च २०१९ रोजी दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्यापूर्वी त्याच्यावर शरीराविरुद्ध ६ व आर्म अॅक्टचा १ असे ७ गुन्हे दाखल आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल मोहिते, सुरेश चौधर, कर्मचारी हेमंत पेरणे, विठ्ठल चोरमले, प्रशांत सरक, सुभाश पिंगळे, श्याम सूर्यवंशी, सचिन पवार यांनी ही कारवाई केली. पुढील तपास हवालदार नितीन धोत्रे करीत आहेत.