पालिकेकडून जादा दराने ताडपत्रीची खरेदी

By admin | Published: June 19, 2017 05:22 AM2017-06-19T05:22:36+5:302017-06-19T05:22:36+5:30

आषाढी वारीतील वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ताडपत्री खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर लोकमत प्रतिनिधींनी शहरातील बाजारपेठेत जाऊन

Tadpatti purchase at a higher rate than the corporation | पालिकेकडून जादा दराने ताडपत्रीची खरेदी

पालिकेकडून जादा दराने ताडपत्रीची खरेदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : आषाढी वारीतील वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ताडपत्री खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर लोकमत प्रतिनिधींनी शहरातील बाजारपेठेत जाऊन ताडपत्रीच्या दरांबाबत चौकशी केली, माहिती घेतली. तसेच आॅनलाइन सर्च केल्यानंतर विविध वितरकांशी बोलल्यानंतर ताडपत्रीत संख्येनुसार दर कमी-अधिक होत असल्याचे कळाले.
दोन हजार रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत ताडपत्री मिळत असल्याचे उघड झाले. त्यामुळे या प्रकरणात ताडपत्रीत घोळ झाल्याचे उघड होते. प्रशासनाने रेट अ‍ॅनालिसीस केले नसून यात महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांची रिंग झाल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांना भेटवस्तू देण्यात येते. गेल्या वर्षी वारकऱ्यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली होती. त्यात गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण गाजले होते. त्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता गेली होती. सत्तांतर होऊन भारतीय जनता पक्षाच्या हाती सूत्रे सोपविली गेली. पारदर्शक कारभाराचा टेंभा मिरविणाऱ्या भाजपाच्या कालखंडातही पूर्वीसारखीच परिस्थिती आहे.

प्रतिताडपत्री एक हजाराचा गैरव्यवहार
बाजारात २४०० रुपयांपर्यंत मिळणारी ताडपत्री भाजपाने ३४१२ रुपयांना खरेदी केली आहे. ६५० ताडपत्री खरेदी करण्यात येणार होत्या. वाढीव दरानुसार २२ लाख १७ हजार ८०० रुपये खर्च अपेक्षित होता. २४०० रुपये दर अपेक्षित धरल्यास १५ लाख ६० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. सुमारे सहा लाख ५७ हजार आठशे रुपयांचा गैरव्यहार झाल्याचे निश्चित झाले आहे. निविदाप्रक्रियेत ना निकोप स्पर्धा झाली ना दर पृथक्करण. कुठे गेला पारदर्शक कारभार?

Web Title: Tadpatti purchase at a higher rate than the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.