दोषींवर कारवाई करा
By admin | Published: March 20, 2017 04:37 AM2017-03-20T04:37:53+5:302017-03-20T04:37:53+5:30
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अंबिल ओढा येथील चेंबरमध्ये पडून एक १४ वर्षांचा मुलगा वाहून गेला, याप्रकरणाची चौकशी करून
पुणे : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अंबिल ओढा येथील चेंबरमध्ये पडून एक १४ वर्षांचा मुलगा वाहून गेला, याप्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून अंबिल ओढ्यामधील चेंबर फोडून तो तसाच सोडून देण्यात आला होता, त्यामुळे नाहक मुलाला प्राण गमवावे लागले होते.
अंबिल ओढा दुर्घटनेचा प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थितकरण्यात आला होता, या पार्र्श्वभूमीवर शनिवारी शासनाकडून हे आदेश काढण्यात आले आहेत. महापालिकेच्या मुख्यसभेतही माजी नगरसेवक धनंजय जाधव आणि मनीषा घाटे यांनी हा विषय मांडला होता. अंबित ओढ्यात स्वच्छ भारत अभियानाचे काम सुरू आहे, त्यासाठीच प्रशासनाकडून हा चेंबर फोडण्यात आला असल्याचा आरोप मनीषा घाटे यांनी केला होता. महापालिकेकडून त्या मुलाच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत करण्याचे आदेश या वेळी महापौर प्रशांत जगताप यांनी दिले होते.
दांडेकर पुलाजवळील अंबिल ओढ्यातील दुर्घटनेमध्ये झालेल्या मुलाच्या मृत्युप्रकरणीमहापालिकेच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)ा