"टक्केवारी"साठी अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:10 AM2021-04-13T04:10:56+5:302021-04-13T04:10:56+5:30
नागरिकांना काही अधिकारी तासन्तास बसवून ठेवतात. प्रभागातील कामांची बिले मंजूर करण्यासाठी ठराविक रक्कम द्यावी (टक्केवारी) देण्याची मागणी थेट नगरसेवकांकडेच ...
नागरिकांना काही अधिकारी तासन्तास बसवून ठेवतात. प्रभागातील कामांची बिले मंजूर करण्यासाठी ठराविक रक्कम द्यावी (टक्केवारी) देण्याची मागणी थेट नगरसेवकांकडेच केली जात आहे. छोट्या छोट्या कारणांसाठी कामांचे प्रस्ताव अडवून ठेवण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजारावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. लस पुरविण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी खासगी हॉस्पिटलकडून पैसे घेत असल्याचा आरोप होत आहे. पालिकेच्या कारभाराबद्दल होत असलेले आरोप आणि माध्यमातील बातम्यांमुळे पालिकेची बदनामी होत असल्याचे बिडकर म्हणाले.
-------
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. रुग्णालयांमध्ये केवळ पुढील दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सभासदांनी आपल्या प्रभागांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केले आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात रक्तदान शिबिर घ्यावे, असे पत्र पक्षाच्या सर्व नगरसेवकांना पाठविण्यात आले आहे.