रोडरोमिआेंवर धडक कारवाई करा, पोलीस अधिकारी शिरगावकर यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:15 PM2018-08-28T23:15:27+5:302018-08-28T23:15:58+5:30
रोडरोमिआेंना रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक : उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांना निवेदन
बारामती : शहर व तालुका हा शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असल्यामुळे तालुका व शहरातून विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळा, कॉलेज व नोकरीनिमित्त येथे येतात. परंतु, काही दिवसांपासून बारामती शहर व तालुक्यात फार मोठ्या प्रमाणावर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थिनींना छेडणाऱ्या रोडरोमिआेंना रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
बारामती शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात महिला व विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटना व टोळीयुद्ध फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रोडरोमिओंच्या त्रासाने बारामती तालुक्यातील एका विद्यार्थिनीने नुकतीच आत्महत्या केल्यामुळे मुलींमध्ये व नागरिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थिनींची छेड काढणे, पाठलाग करणे व विचित्र इशारे करणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. तसेच, बारामती शहराच्या व ग्रामीण भागांमध्ये विविध ठिकाणी टोळक्यांकडून होणाºया छेडछाडीमुळे अनेक विद्यार्थिनी शाळा व कॉलेजमध्ये जाण्यास घाबरत आहेत. बारामती शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यालगत अस्ताव्यस्त गाड्या पार्किंग करून तसेच रस्त्याच्या बाजूला उभे राहून जाणीवपूर्वक वाहतुकीला अडथळा निर्माण केला जातो. त्यामुळे येणाºया-जाणाºया नागरिकांना तसेच महिला व विद्यार्थिनींना वाहन चालवणे, रस्त्यावरून चालणेदेखील अवघड होते. युवा सेना पुणे जिल्हा युवा अधिकारी राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामार्फत पोलीस प्रशासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या. दामिनी पथकासोबत राजमाता जिजाऊ साहेब पथक व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पथकांची निर्मिती करून मुलींना स्वरक्षणाचे धडे द्यावेत, मुलींच्या मनातील भीती काढण्यासाठी समुपदेशन केंद्राची निर्मिती करावी, रोडरोमिओंवर कारवाई करताना संबंधित गुन्हेगारावर कारवाई होऊ नये म्हणून कोणत्याही राजकीय किंवा इतर व्यक्तींकडून हस्तक्षेप झाल्यास सदर घटनेमध्ये हस्तक्षेप करणाºयांची नावे सार्वजनिकरीत्या पुराव्यानिशी जाहीर करावीत, महिला किंवा विद्यार्थिनी यांनी छेडछाडीची तक्रार केल्यास त्याची तत्काळ दखल घेऊन प्रशासनाने कठोर कारवाई करावी. जेणे करुन रोडरोमिओंवर कायद्याची जरब बसेल.
४पथकांनी फक्त फेरी न मारता विद्यार्थिनी, पालक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याशी वारंवार संवाद साधून त्यांना बळ द्यावे. बारामती शहरातील प्रमुख चौकातील कॅमेरे व सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस ठाण्याशी जोडण्यात यावी, ग्रामीण भागातील बस स्थानकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.
४शाळा, महाविद्यालय, बस स्टँड व सार्वजनिक ठिकाणांवरील रोडरोमिओंचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा, पोलीस प्रशासनाने दामिनी पथक स्थापन करून पथक व पोलीस हेल्पलाईनचे संपर्क क्रमांक शाळा व महाविद्यालयांच्या बाहेर लावावेत, शाळा-महाविद्यालये भरतेवेळी व सुटण्याच्या वेळी या पथकांनी तिथेच उभे रहावे असे आवाहनही यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.
४मागण्यांची दखल न घेतल्यास युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. प्रशासनाने दखल घेऊन संबंधित रोडरोमिओ व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाºया समाजकंटकांना धडा शिकवावा, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली. या वेळी युवा सेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी अॅड. अनिल शेडगे, युवा सेना तालुका समन्यवक संदीप गावडे, युवा सेना प्रसिद्धी अधिकारी अक्षय बाफना, निखिल नाटकर, सागर तावरे, अक्षय सत्रे, नीलेश महाडिक, अक्षय शेडगे, कमेश पाटोळे यांच्यासह मोठ्या संख्येने युवा सैनिक उपस्थित होते.