बारामतीत बेशिस्त पार्किंगवर कारवाईचा बडगा
By admin | Published: December 22, 2015 01:33 AM2015-12-22T01:33:06+5:302015-12-22T01:33:06+5:30
: शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
बारामती : शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला
आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील प्रमुख चौकांमधील बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या ५० वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली.
शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ‘लोकमत’ने सातत्याने शहरातील वाहतूक व पार्किंगच्या समस्येबाबत पाठपुरावा केला आहे.
शहरातील बेशिस्त वाहतूक, अस्ताव्यस्त पार्किंग व दिखाऊ सिग्नल यंत्रणा यामुळे छोठे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. त्यातच पदपथांवर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे पायी जाणाऱ्या नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागते. वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होते. मात्र या कारवाईत सातत्य नाही.
ही समस्या प्रामुख्याने महावीर पथ, कचेरी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (सिनेमा रोड), गुणवडी चौक, भिगवण चौक, भाजी मंडईचा परिसर, कारभारी चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणत आहे.
बाजारपेठेतील रस्त्यांच्या रुंदीच्या मानाने त्यावर वाहनांचा अधिक भार आहे. एखादे
चारचाकी वाहन या ठिकाणाहून निघाल्यास त्याच्या मागे वाहनांची
रांग लागते.
(प्रतिनिधी)