‘सिंहगड’च्या तासिका सुरू करण्याची कार्यवाही करा, तंत्रशिक्षण विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 05:31 AM2018-02-15T05:31:06+5:302018-02-15T05:31:14+5:30
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्राध्यापकांनी केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठाने महाविद्यालयातील तासिका व प्रात्याक्षिके सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांनी केली आहे.
पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्राध्यापकांनी केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठाने महाविद्यालयातील तासिका व प्रात्याक्षिके सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांनी केली आहे.
तंत्रशिक्षण विभागाकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना बुधवारी याबाबत पत्र दिले. सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या २२ महाविद्यालयांमधील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाºयांना गेल्या १६ महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. सिंहगडची वडगाव, नºहे, कोंढवा, वारजे, लोणावळा, सोलापूर आदी ठिकाणी २२ आभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालये आहेत. एआयसीटीईकडे तक्रारीनंतर ३१ जानेवारीच्या आत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन अदा करण्याचे निर्देश दिले होते; पण संस्थेने त्याचे पालन केले नाही.
शासनाकडून मिळणारी रक्कम प्रलंबित
सिंहगड संस्थेला स्कॉलरशिपपोटी थकलेली ८० टक्के रक्कम अदा करण्यात आल्याचे प्रसारित करण्यात आले; परंतु तशी वस्तुस्थिती नाही. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी समाजकल्याण विभागाकडून ११७.५७ कोटी इतकी रक्कम येणे आहे. शिक्षकांना गेल्या १४ महिन्यांपासून पगार दिला गेलेला नाही, हे सत्य नाही. सरासरी ५० ते ६० टक्के इतकीच पगाराची रक्कम वरील कारणामुळे प्रलंबित आहे. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये,असे निवेदन सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले.