आॅक्टोबर हीट संदर्भात घ्या काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 02:36 AM2018-10-02T02:36:38+5:302018-10-02T02:37:05+5:30
ऋतुमानात अचानक बदल : वैद्यकीय सल्ल्याने काही पथ्ये पाळणे आवश्यक
पुणे : पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळा सुरू होण्याच्या मध्यंतरीच्या काळात जी उष्णतेची लाट निर्माण होते यामुळे आपल्याला गरमी जाणवू लागते यालाच आॅक्टोबर हीट असे म्हणतात. या हीट संदर्भात काळजी घेणे फारच गरजेचे आहे.
आपल्याकडे उन्हाळा हा ऋतू येण्याअगोदर लोक उपाययोजना करत असतात; परंतु पावसाळ्यानंतर येणाऱ्या या उष्णतेच्या लाटेकडे कोणीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे उष्णतेपासून निर्माण होणाºया आजारांना विनाकारण सामोरे जावे लागते. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या आॅक्टोबर हीटला सुरुवात होते. सुरुवातीचा काळ आपल्याला जास्त प्रमाणात गरमी जाणवत नाही. पण, एक आॅक्टोबरनंतर हे गरमीचे प्रमाण वाढू लागते. ऋतुमानात अचानक बदल झाल्याने सर्व ठिकाणी उष्णता वाढायला सुरुवात होते.
उष्णतेमुळे होणारे आजार : आॅक्टोबर हीटमध्ये शरीरातील उष्णता वाढल्याने खूप प्रमाणात घाम येणे, डोळे लाल होणे, चेहरा लाल होणे या लहान आजारांपासून सुरुवात होते. उष्णतेमुळे शरीरात पित्त तयार होते. या पित्ताचे दोन प्रकार आहेत.
१. आम्लपित्त २. शीतपित्त
आम्लपित्तामुळे घशात जळजळ, उलट्या, जुलाब हे आजार होऊ लागतात. शीतपित्तामुळे अंगावर चट्टे उठणे, बारीक लाल फोड येणे, हात-पायांना खाज सुटणे असे त्रास होतात. या हीटमध्ये दुपारी उन्हात फिरल्याने चक्कर, त्वचा कोरडी पडणे हे त्रास होतात. या आॅक्टोबर महिन्यात नकळत पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आपली पचनशक्ती कमी होते, त्यामुळे पोट साफ होत नाही. या कारणामुळे उष्णता वाढू लागते व मूळव्याध, बद्धकोष्ठता, असे आजार होऊ लागतात. आॅक्टोबर महिन्यात हवा कोरडी असते. त्यामुळे त्वचा कोरडी पडण्याबरोबरच डोळे येणे, रांजणवाडी येणे अशा आजारांना सामोरे जावे लागते.
उष्णतेच्या आजारांवरील उपाय
च्दिवसभरात अर्ध्या तासाच्या अंतरामध्ये २०० एमएल पाणी प्यावे.
च्सकाळी नाष्ट्याला इडली-चटणी सारखे हलके पदार्थ खावेत.
च्दररोजच्या आहारात कलिंगड, टरबूज, सफरचंद अशा फळांचे अधिक प्रमाण असणे गरजेचे आहे. या फळांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते.
च्आपल्या आहारात जेवतानाा पोळी, भाजी, भात, भाकरी असा हलका आहार घ्यावा.
च्जेवण झाल्यावर बसून राहू नये. एक ते दोन किलोमीटर चालणे गरजेचे आहे.
च्उन्हात फिरत असताना डोके, डोळे झाकावे त्यामुळे डोळे लाल होणे, चक्कर येणे अशा गोष्टी घडणार नाहीत.