ग्रामीण भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करा: राहुल कुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:10 AM2021-03-05T04:10:19+5:302021-03-05T04:10:19+5:30
पाटेठाण : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही योजना तातडीने सुरू करा, यासोबतच ग्रामीण भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी ...
पाटेठाण : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही योजना तातडीने सुरू करा, यासोबतच ग्रामीण भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली.
कुल म्हणाले की, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही योजना मागील तीन महिन्यांपासून कागदावरच आहे. ती स्थगित झालेली असून, त्वरित सुरू करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भाग आणि जनता ही कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. शेतीचे भवितव्य हे पाण्यावर अवलंबून असते. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या झालेल्या योजनांचा कुठल्याही प्रकारचा निधी काही मराठवाड्याच्या अनुशेषाच्या नावाखाली नवीन काम हाती न घेणे हे आम्ही समजू शकतो. अब्जावधी रुपयांच्या योजना ना दुरुस्त असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी नाश होतेय. एका बाजूने आपण जलयुक्त शिवारसारखी देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगली योजना राबवण्याचा प्रयत्न केला. याचा जिरायत भागात फायदा झाला. पाणी असता ते शेतापर्यंत नेण्याची व्यवस्थेची मात्र दुरवस्था झाली आहे.
जिल्ह्यात बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक पशुधन मारले गेले आहे. ज्या शेतकऱ्यांना वन विभागाच्या जमिनी महसूल विभागाने दिल्या. १९८० पूर्वी निर्वणीकरणाचे अधिकारी आणि वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. आणि १९८० चा केंद्र सरकारचा वनसंवर्धन कायदा आल्यानंतर मात्र अतिशय अडचण त्या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्र असे आहे की, ते महसूल विभागाने वाटले. परंतु, केंद्राच्या कायद्यामुळे आज कुठल्याही वहिवाटीला तसेच नवीन काही करायला अडचण येत आहे.