सांभाळा...औंध-बाणेरमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:03+5:302021-09-16T04:16:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रथमपासून सर्वाधिक रुग्णसंख्या राहिलेल्या औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतच आजमितीला शहरातील सर्वात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रथमपासून सर्वाधिक रुग्णसंख्या राहिलेल्या औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतच आजमितीला शहरातील सर्वात जास्त ३३९ इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वात जास्त बाधित झालेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात व दाट लोकवस्तीच्या भागात म्हणजेच, भवानी पेठ येथे २१ तसेच कसबा-विश्रामबागवाडा येथे ११ इतके सर्वात कमी सक्रिय रुग्ण आहेत.
पुणे महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयानिहाय १३ सप्टेंबरच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. शहरातील इतर क्षेत्रिय कार्यालयनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :
ढोले पाटील रोड : ६७
नगर रोड : १८३
येरवडा, कळस, धानोरी : ६२
घोले रोड, शिवाजीनगर : ५८
कोथरूड, बावधान : १३३
सिंहगड रोड : २४३
वारजे, कर्वेनगर :- ११२
धनकवडी, सहकारनगर : १६५
हडपसर, मुंढवा : २४६
कोंढवा, येवलेवाडी :- ४५
वानवडी, रामटेकडी :- ४६
बिबवेवाडी :- ७०