घरगुती गॅस वापरताना दक्षता घ्या
By admin | Published: January 23, 2017 02:17 AM2017-01-23T02:17:42+5:302017-01-23T02:17:42+5:30
घरगुती गॅस वापरत असताना दक्षता घ्यावी. आपली सुरक्षितता राखून गॅसचा वापर करावा. स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर रेग्युलेटर
भिगवण : घरगुती गॅस वापरत असताना दक्षता घ्यावी. आपली सुरक्षितता राखून गॅसचा वापर करावा. स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर रेग्युलेटर बंद करून सुरक्षित राहावे, असे आवाहन भारत गॅसचे विक्री अधिकारी संदीप पवार यांनी केले.
बिल्ट कंपनी येथे गिरिजा भारत गॅस भिगवणच्या वतीने आयोजित सुरक्षा सप्ताहात ते बोलत होते. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, भादलवाडीच्या सरपंच राणी कन्हेरकर, स्वाती कन्हेरकर, बिल्ट युनियन अध्यक्ष प्रमोद बंडगर, सीताराम खारतोडे, धनाजी थोरात, नंदकुमार पानसरे, गिरिजा भारत गॅसचे प्रमुख अनिकेत भरणे आदी उपस्थित होते.
गॅस वापरताना घ्यावयची काळजी, प्रतिबंधात्मक उपाय यासाठी सुरक्षितता राखण्यासाठी ‘सुरक्षा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विजेत्यांना ५ पैठणी साड्या, ५० कुकिंग अॅपरॉन वाटप केले.
वैशाली पाटील म्हणाल्या, महिलांनी गॅसचा वापर काटकसरीने करावा. त्यामुळे भावी काळासाठी इंधनाची बचत होईल. आपल्या गॅसची दर दोन वर्षांनी नियमित तपासणी करून घ्यावी. जोगिंदर सिंग यांनी प्रास्ताविक केले. तर अनुष्का भरणे यांनी आभार मानले. (वार्ताहर)