मोबाईलचा ‘हत्ती’ घ्या परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:14 AM2021-08-25T04:14:29+5:302021-08-25T04:14:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फोटो, अहवाल, प्रतिक्रिया सगळे काही मोबाईलवर पाठवण्याच्या आग्रहाने ‘हँग’ होणाऱ्या मोबाईलच्या दुरुस्तीने वैतागलेल्या अंगणवाडी ...

Take the mobile 'elephant' back | मोबाईलचा ‘हत्ती’ घ्या परत

मोबाईलचा ‘हत्ती’ घ्या परत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : फोटो, अहवाल, प्रतिक्रिया सगळे काही मोबाईलवर पाठवण्याच्या आग्रहाने ‘हँग’ होणाऱ्या मोबाईलच्या दुरुस्तीने वैतागलेल्या अंगणवाडी सेविकांनी राज्यभरात ‘मोबाईल परत’ आंदोलन सुरू केले. पुण्यात मंगळवारी (दि. २४) तीन ठिकाणी सेविकांनी मोबाईल परत केले.

एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात अंगणवाड्या चालवल्या जातात. त्यावर अंगणवाडी सेविकांची नियुक्ती असते. या अंगणवाड्यांचा अहवाल मोबाईलवर पाठवण्याचा आदेश वर्षभरापूर्वी निघाला. त्यासाठी राज्यात सव्वा लाख मोबाईलची खरेदी करून ते अंगणवाडी सेविकांना देण्यात आले.

सुरुवातीला एक अहवाल मोबाइलवरून पाठवायचा होता. त्यात बदल होत होत आता २२ प्रकारचे अहवाल अंगणवाडी सेविकांना वरिष्ठ कार्यालयाला पाठवावे लागतात. त्याशिवाय फोटोही पाठवण्याचा आदेश निघाला. नंतर प्रतिक्रिया घेऊन त्याही पाठवाव्या लागत आहेत. या मोबाईलची साठवण क्षमता कमी आहे. अतिरिक्त वापराने ते आता नादुरुस्त होत आहेत. या दुरुस्तीचा खर्च सेविकांनाच करावा लागतो. हाताने लिहिलेले अहवाल पाठवायचे आणि मोबाईलवरही या दुहेरी त्रासाने व त्यात दुरुस्ती खर्च यामुळे अंगणवाडी सेविका त्रासल्या आहेत.

चौकट

तुटपुंज्या पगारात दुरुस्तीचा बोजा

अंगणवाडी कृती समितीचे अध्यक्ष नितीन पवार यांनी सांगितले की, कार्यालयीन वापरासाठी दिलेले मोबाईल अंगणवाडी सेविकांसाठी आता ‘हत्ती’ झाले आहेत. तुटपुंज्या वेतनात मोबाईल दुरुस्तीचा बोजा त्यांच्यावर पडत आहे. त्यामुळेच संघटनेने मोबाइल परत करण्याचे आंदोलन राज्यात केले. एकात्मिक बाल विकासच्या जिल्हा व शाखा कार्यालयात जाऊन अंगणवाडी सेविका ताई त्यांच्याकडील मोबाईल परत देत आहेत.

Web Title: Take the mobile 'elephant' back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.