विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:10 AM2021-05-09T04:10:58+5:302021-05-09T04:10:58+5:30

येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थिती आणि उपाययोजनांची आढावा बैठक शनिवारी (दि. ८) उपमुख्यमंत्री पवार ...

Take stern action against those who go out for no reason | विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करा

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करा

Next

येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थिती आणि उपाययोजनांची आढावा बैठक शनिवारी (दि. ८) उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पंचायत समिती सभापती नीता फरांदे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रमोद काकडे, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेते सचिन सातव आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, बारामती तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्यावर उपचार करण्यासाठी योग्य ते नियोजन करा. कोरोना महामारीच्या संकट काळात शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य उपलब्ध होणे आवश्यक आहे, रुग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. बारामती येथील महिला रुग्णालयात जनरेटर बसवून घेण्याची सूचना पवार यांनी केल्या.

बारामती येथे आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

०८०५२०२१ बारामती—०२

Web Title: Take stern action against those who go out for no reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.