फसवणा-यांचा सूड घ्या, नगरसेवकांच्या कार्यक्रमात संजय राऊत यांची मोदींवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 05:51 AM2018-01-26T05:51:20+5:302018-01-26T05:53:38+5:30

देशातच नाही तर परदेशात जाऊनही मोदी थापाच मारतात. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात आम्ही ६०० कोटी मते घेऊन निवडून आलो आहोत, असे त्यांनी परवाच दावोस येथे सांगितले.

 Take vengeance on fraud, criticize Modi for Sanjay Raut in corporator's program | फसवणा-यांचा सूड घ्या, नगरसेवकांच्या कार्यक्रमात संजय राऊत यांची मोदींवर टीका

फसवणा-यांचा सूड घ्या, नगरसेवकांच्या कार्यक्रमात संजय राऊत यांची मोदींवर टीका

Next

पुणे : छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव घेत सत्तेवर आले. मात्र त्यानंतर जनतेची फसवणूकच केली. अशा फसव्या लोकप्रतिनिधींचा पराभव करून त्यांचा सूड घ्या, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. स्वबळावर सत्तेवर येण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण करणारच, असा निर्धार त्यांनी शिवसैनिकांची साथ घेत व्यक्त केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ मध्ये (महंमदवाडी कौसरबाग) नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे व नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या प्रभागातील विविध विकासकामांचे उद््घाटन राऊत यांच्या हस्ते झाले. खासदार शिवाजीराव आढळराव, शहरप्रमुख महादेव बाबर, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, नगरसेविका संगीता ठोसर, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख विजय देशमुख, तानाजी लोणकर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी थापा मारतात. त्यांच्या नावावर निवडून आलेले आमदार, खासदार हेही थापाच मारतात. सगळ्यांनी मिळून जनतेला फसवण्याचा उद्योग सुरू केला आहे. देशातच नाही तर परदेशात जाऊनही मोदी थापाच मारतात. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात आम्ही ६०० कोटी मते घेऊन निवडून आलो आहोत, असे त्यांनी परवाच दावोस येथे सांगितले, अशी टीका राऊत यांनी केली.
खासदार शिवाजीराव आढळराव म्हणाले, सध्याचे सरकार केवळ योजनांची घोषणा करित आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम करत नाही. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
शेतकरी नाराज आहे, व्यापारी भाजपाच्या जवळ जात नाही. त्यामुळे शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या लाटेते भाजपाचे खासदार, आमदार कुठेच दिसणार नाही.

Web Title:  Take vengeance on fraud, criticize Modi for Sanjay Raut in corporator's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.