Pune Metro: मेट्राे स्थानकापासून शेअर रिक्षामध्ये बसताय...? असे असेल भाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 02:54 PM2023-08-11T14:54:42+5:302023-08-11T14:56:39+5:30
रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर शेअर रिक्षाचे भाडे निश्चित केले असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली....
पुणे : शहरातील मेट्रोच्या ११ स्थानकांपासून परिसरातील शेअर रिक्षाचे प्रवासी भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जाहीर केले आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा संघटनांना केले आहे. घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना शेअर रिक्षा उपयुक्त ठरणार आहे. रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर शेअर रिक्षाचे भाडे निश्चित केले असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.
...असे असेल शेअर रिक्षाचे भाडे
मेट्रो स्थानक - परिसर (किलोमीटर)- प्रतिप्रवासी भाडे रुपयांत (किमान ते कमाल)
१) वनाज - ४.७ -- ११ रु. ते २७ रु.
२) आनंदनगर - ४.४ रु. - ११ रु. ते ४३ रु.
३) आयडीयल कॉलनी - ४.६ रु. - १२ रु. ते ३७ रु.
४) नळस्टॉप - २.४ रु. - ११ रु. ते २२ रु.
५) गरवारे कॉलेज - १.३ रु. - १२ रु. ते १५ रु.
६) महापालिका भवन - १.७ रु. - १२ रु. ते २७ रु.
७) शिवाजीनगर न्यायालय - १.४ रु. - ११ रु.
८) मंगळवार पेठ (आरटीओ) - ४.६ रु. - ११ रु. ते ३७ रु.
९) पुणे रेल्वे स्टेशन - २.५ रु. - ११ रु. ते २१ रु.
१०) रुबी हॉल - ३.५ रु. - ११ रु. ते ३० रु.
११) शिवाजीनगर एसटी स्थानक - ३.४ रु. - ११ रु. ते ३० रु.