Pune: कारवाई केल्याने रिक्षाचालकाने महिला पोलिसासमोर स्वतःवर वार करत दिली धमकी

By विवेक भुसे | Published: July 11, 2023 03:19 PM2023-07-11T15:19:30+5:302023-07-11T15:24:50+5:30

तुमच्याकडे बघून घेतो, असे म्हणून स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार करुन जखमी करुन घेण्याचा प्रकार समोर आला आहे...

Taking action, the rickshaw puller threatened to stab herself in front of the lady police | Pune: कारवाई केल्याने रिक्षाचालकाने महिला पोलिसासमोर स्वतःवर वार करत दिली धमकी

Pune: कारवाई केल्याने रिक्षाचालकाने महिला पोलिसासमोर स्वतःवर वार करत दिली धमकी

googlenewsNext

पुणे :पुणे रेल्वे स्टेशन येथे नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या रिक्षावर कारवाई करत असताना महिला पोलीस अंमलदाराच्या हातातून ई चलन मशीन हिसकावून घेतले. त्यांना तुमच्याकडे बघून घेतो, असे म्हणून स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार करुन जखमी करुन घेण्याचा प्रकार समोर आला आहे.

सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरुन बंडगार्डन पोलिसांनी वृषभ बाबा पिसे (वय २३, रा. येरवडा) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दिपमाला राजू नायर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे रेल्वे स्टेशनच्या इन गेटजवळ सोमवारी दुपारी साडेबारा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषभ पिसे हा रिक्षा घेऊन नो पार्किंगमध्ये थांबला होता. फिर्यादी या त्याच्याकडे असलेल्या ई चलन मशीनद्वारे कारवाई करत होत्या. त्यावेळी पिसे याने त्यांच्याकडील ई मशीन काढून घेतले. फिर्यादी यांना बघून घेतो, असे म्हणून स्वत:चे अंगावर ब्लडने वार करुन घेतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.

Web Title: Taking action, the rickshaw puller threatened to stab herself in front of the lady police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.