PMP बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन तरुणीच्या पाठीवर फिरवला हात, तरुण अटकेत

By विवेक भुसे | Published: August 14, 2023 04:48 PM2023-08-14T16:48:46+5:302023-08-14T16:50:11+5:30

हा प्रकार हडपसर मधील गाडीतळ येथे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला...

Taking advantage of the crowd in the PMP bus, he put his hand on the young woman's back, the young man was arrested | PMP बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन तरुणीच्या पाठीवर फिरवला हात, तरुण अटकेत

PMP बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन तरुणीच्या पाठीवर फिरवला हात, तरुण अटकेत

googlenewsNext

पुणे : पीएमपी मधून जाताना गर्दीत पाठीवरून हात फिरवून तिचा विनयभंग करणाऱ्याला युवतीने चांगलाच धडा शिकवला. युवतीने या प्रकाराची थेट पोलिसात तक्रार केली. प्रतीक रामबृज जैस्वाल (वय २०,रा. बरसेरवॉ,पो. बहादूरपूर,आजमगड,उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. याबाबत हांडेवाडी येथील एका १६ वर्षांच्या युवतीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार हडपसर मधील गाडीतळ येथे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या हडपसर येथील गाडीतळ बसस्टॉप येथून बसमध्ये चढत होत्या. त्यांच्या मागोमाग आरोपी प्रतीक हा चढत असताना त्याने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला व त्यांच्याशी अश्लील चाळे केले. तेव्हा या युवतीने हिंमत दाखवून त्याला चांगलाच चोप दिला. तरीही तो तिचा पाठलाग करून तिची छेड काढू लागला. पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलिस निरीक्षक थोरबोले तपास करीत आहेत.

Web Title: Taking advantage of the crowd in the PMP bus, he put his hand on the young woman's back, the young man was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.